पुणे

उंड्रीत मद्यधुंद टेम्पो चालकाचा थरार! तीन मुली थोडक्यात बचावल्या | नागरिकांचा संताप

पुण्यातील उंड्री परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रात्रीच्या वेळी खडी क्रशरचा टेम्पो वडाचीवाडीहून उंड्री चौकाकडे येत असताना, दारूच्या नशेत चालकाने रस्त्यावर चालणाऱ्या तीन मुलींवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने मुलींनी वेळीच प्रसंगावधान दाखवत पळ काढला आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र हा टेम्पो थेट रस्त्यालगत असलेल्या बिल्डरच्या पत्र्यांवर आदळून अर्धा आत घुसला.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून चोप दिला.

दरम्यान, होळकरवाडी–उंड्री परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून, बेकायदा उत्खननामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देत ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.