पुण्यातील Hadapsar परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
२५ वर्षीय विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण करत, तिच्या संमतीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या देऊन बेकायदा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे, तर तिच्या खोलीत परवानगीशिवाय सीसीटीव्ही बसवून तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. तसेच, तिला नांदवण्यास नकार देत सतत शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.
या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक Sanjay Mogle करत आहेत.
