पुणे

पुण्यात अनधिकृत टपऱ्यांचा सुळसुळाट! PMC चं दुर्लक्ष? मोठा खुलासा

पुण्यातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
K K Market परिसरातील महानगरपालिकेच्या ट्रक टर्मिनस आणि पार्किंग जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्यांचे जाळे उभे राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही जागा मूळतः ट्रक पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी राखीव असताना, सध्या येथे बेकायदेशीर टपऱ्यांमुळे पार्किंगची कमतरता आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, या प्रकाराकडे Pune Municipal Corporation च्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसेच, या टपऱ्यांकडून कोण भाडे वसूल करत आहे, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून, अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून, सर्व अनधिकृत टपऱ्या हटवून जागेचा मूळ उद्देशासाठी वापर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.