पुणे

आजीच्या मृत्यूमागचं धक्कादायक सत्य उघड!

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे…”

विहाळ गावात 82 वर्षीय आजीचा मृत्यू सुरुवातीला नैसर्गिक असल्याचं वाटत होतं. मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य उघड झालं.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या आजी वारंवार मदतीसाठी हाक देत होत्या. याच कारणावरून घरात वाद झाला आणि त्या रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय आहे.

घटनेनंतर हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि तपासात विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली.

चौकशीत नातीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून, तिच्यावर खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 “सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.”