आयपीएल 2026 च्या क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. मात्र या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती राजस्थानच्या युवा स्टार वैभव सूर्यवंशीची.
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने 47 चेंडूत 96 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 8 चौकार आणि 7 षटकार ठोकत राजस्थानला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण संघाचा पराभव झाल्यानंतर वैभवला अश्रू अनावर झाले.
डगआऊटमध्ये बसलेला वैभव रडताना दिसला आणि हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेटप्रेमी त्याचे सांत्वन करत आहेत.
दुसरीकडे शुभमन गिलच्या शानदार शतकाच्या जोरावर गुजरातने तिसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता 31 मे रोजी गुजरात आणि आरसीबी यांच्यात जेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.
96 धावा करूनही वैभव सूर्यवंशी रडला! RR च्या पराभवानंतर भावूक क्षण
