पुणे

विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई! हडपसर पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी निलंबित

पुण्यातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, एपीआय हसीना सिकलगार आणि पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे.
हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरू असताना वेळेत कारवाई का झाली नाही, यावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी जबाबदारी निश्चित करत ही कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.