पुणे

पुण्यात 50 लाखांसाठी ठेकेदाराचे अपहरण!

“पुण्यात मेट्रो ठेकेदाराच्या अपहरणाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे…”

गहुंजे परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय ठेकेदाराला ओळखीचा फायदा घेत जाळ्यात ओढण्यात आलं. खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना सोबत नेण्यात आलं… आणि त्यानंतर 50 लाखांची खंडणी मागण्यात आली.

या प्रकरणी खराडी पोलिसांनी सागर दत्तात्रय झुरुंगे, विजय सुरेश वाळुंज, राजू विजयकुमार सहाणे, रूपेश शिवाजी गावडे आणि प्रकाश बाळासाहेब राऊत या पाच आरोपींना अटक केली आहे.

अपहरण झालेल्या ठेकेदाराने पोलिसांत फिर्याद दिली असून, हा प्रकार आर्थिक व्यवहारातून घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

👉 “सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.”