पुणे

कदमवाकवस्ती येथे नंदू पाटील काळभोर व मित्र परीवार यांचा दसरा (विजयादशमी) मेळावा मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न

पुणे:प्रतिनीधी;( रमेश निकाळजे )
सालाबादप्रमाणे कदमवाकवस्ती गाव येथे माजी सरपंच नंदू पाटील काळभोर,व त्यांचा मित्र परिवार यांच्या वतीने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळी जेष्ठ समाजिक कार्यकर्ते सुभाष तात्या काळभोर तसेच बाबाराजे काळभोर – उपसरपंच , ऋषीकेश काळभोर-मा.उपसरपंच, मयूर कदम- सदस्य,विशाल गुजर ( Bjp ),अजित खैरे, रमेश गायकवाड(RPI ) अध्यक्ष,शरीफ पठाण ग्रा.प. स., नितीन लोखंडे, प्रकाश साबळे, डॉ. रतन काळभोर, दादा काळभोर, रमेश निकाळजे, दत्तोबा चव्हाण, विजय थोरात, नागसेन ओव्हळ यांच्या उपस्थितीत पार पडला.
कदमवाकवस्ती मधील सर्वच मित्र परिवार व कार्यकर्ते यांनी या मेळाव्यानिमित्त होणाऱ्या रॅली मध्ये उस्फुर्त पणे सहभाग घेतला होता त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले सर्वच लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सर्वजण एकमेकांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देत होते.
सायंकाळी कदमवाकवस्ती मधील सर्व भागातील कवडीपाठ पासून वाकवस्ती, पांडवदंड,घोरपडे वस्ती, संभाजीनगर,होरब नगर,समतानगर,इंदिरानगर,खोले वस्ती,रेल्वे कॉलनी, लोणी स्टेशन याठिकाणचे सर्व नंदुपाटील काळभोर यांचा मित्र परीवार त्यांच्या ऑफिस जवळ जमा झाला होता, साधारण साडेसहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण हनुमान मंदिरात गेले सर्वानी दर्शन घेवून जय शिवाजी ,जय भवानी अशा घोषणा दिल्या व दसऱ्यानिमित्त शुभेच्छा पर भाषण झाले व पुढे मेळाव्याचे रॅलीत रूपांतर होऊन रॅली कदम वस्ती, पठारे वस्ती , इंदिरानगर, समता नगर,खोले वस्ती येथे बसलेल्या देवींचे दर्शन घेऊन लोणी स्टेशन चौकात नंदू पाटील काळभोर यांच्या ऑफीस जवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.
नंदू पाटील काळभोर यांनी पुन्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या