पुणे

अमृता लॉजमध्ये अवैध धंद्याचा पर्दाफाश

“बारामतीत पोलिसांची मोठी कारवाई… अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश!”

बारामती-भिगवण रोडवरील वंजारवाडी जवळील सोमनाथ हॉटेलच्या अमृता लॉजवर पहाटे ३ वाजता पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत अजित जयसीन शेट्टी आणि चाँद कलाम आलम या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

तपासात आरोपी बाहेरून महिलांना आणून ग्राहकांना पुरवत असल्याचं समोर आलं आहे.

या छाप्यात पाच महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

👉 “बारामती तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”