नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय…
वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या एका NGO वर गंभीर आरोप झालेत!
23 वर्षांच्या तरुणीने तक्रार दिल्यानंतर
संस्थेचे अध्यक्ष रियाज काजी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारीनुसार…
कपाळावर किस करण्याचा प्रयत्न, जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न…
आणि वारंवार लैंगिक छळ केल्याचे आरोप आहेत.
इतकंच नाही…
इंस्टाग्रामवर फेक आयडी बनवून महिलांवर लक्ष ठेवण्याचाही आरोप समोर आलाय.
नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी…
आणि धार्मिक गोष्टी करण्यासाठी दबाव टाकल्याचंही म्हटलं जातंय.
पोलिसांनी लैंगिक छळ आणि आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
आणि आणखी काही पीडितांचे जबाब नोंदवले जात आहेत.
या प्रकरणामुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे…
नागपूर NGO प्रकरणात धक्कादायक खुलासे 😳
