पुणे

वारकऱ्यांसाठी गुड न्यूज! आषाढी वारी होणार अधिक सुविधायुक्त

“पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!
यंदाची आषाढी वारी अधिक सुखकर आणि सुविधायुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक सुसज्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत या तयारीचा आढावा घेण्यात आला.
सुमारे 1303 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यापैकी आतापर्यंत 959 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

 

या अंतर्गत स्वच्छतागृहे, पालखी कट्टे, हायमास्ट लाईट्स, रस्ते दुरुस्ती आणि संरक्षक भिंती यांसारखी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.

याशिवाय, वारकऱ्यांना विश्रांतीसाठी अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही सांगण्यात आले.

यंदाची वारी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.”