पुणे

खाजगी रुग्णालयांच्या लुटीला ब्रेक? सरकारचा मोठा निर्णय!

“खाजगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलांवर आता ब्रेक लागणार का? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
वैद्यकीय उपकरणांवर रुग्णालयांनी किती नफा घ्यावा यावर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे.

माहितीनुसार, सिरिंज, कॅन्युला, ग्लोव्ह्ज यांसारख्या रोजच्या वस्तूंपासून ते पेसमेकर आणि हार्ट व्हॉल्व्हसारख्या महागड्या उपकरणांपर्यंत या नियमांचा समावेश होऊ शकतो.

सध्या काही ठिकाणी 10 ते 30 पट जास्त बिल आकारले जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्ण आणि विमा कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण पडतोय.

 

दरवर्षी 14 ते 15 टक्क्यांनी वाढणारी मेडिकल महागाई लक्षात घेता, विमा प्रीमियमही वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर सरकार बिलिंगमध्ये पारदर्शकता आणून उपचार खर्च कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.

जर हा निर्णय लागू झाला, तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.”