पुणे

लग्नाची पत्रिका बहाणा… वृद्ध महिलेची हत्या 😨

मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी एका वृद्ध महिलेची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामसखी धाकड या आपल्या 13 वर्षीय नातीसोबत घरी होत्या. दुपारी तीनच्या सुमारास तीन जण बाईकवर आले आणि “लग्नाची पत्रिका द्यायची आहे” असं सांगत दरवाजा उघडायला लावला. दरवाजा उघडताच त्यांनी नमस्कार करण्याच्या बहाण्याने खाली वाकून अचानक हल्ला करत महिलेचा जीव घेतला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. नातीने संपूर्ण प्रकार डोळ्यांसमोर पाहिल्याने ती घाबरून किंचाळू लागली.

प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे जमिनीचा वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुटुंबातील काही सदस्यांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता, आणि त्यातूनच हा कट रचला गेला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

जखमी अवस्थेत महिलेना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.