काळेपडळ परिसरात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. वेल्डिंगच्या कामादरम्यान एका मजुराला उच्च दाब वाहिनीचा जोरदार धक्का बसला. या भीषण अपघातात तो तब्बल 60 टक्के भाजला होता.
गंभीर अवस्थेत त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान 23 एप्रिल 2026 रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DXjTOk1EdiH/
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही घटना परिसरातील उच्च दाब वाहिन्या धोकादायकरीत्या जवळ असल्यामुळे घडली. हडपसर आणि आसपासच्या भागात अशा उघड्या आणि धोकादायक वाहिन्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आता प्रश्न उपस्थित होतोय — अजून किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या सर्व उच्च दाब वाहिन्या तात्काळ भूमिगत करण्यात याव्यात आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
