मुंबई अंडरवर्ल्डमधील दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील वैर केवळ 1993 च्या बॉम्बस्फोटांमुळेच निर्माण झालं, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, यामागे आणखी काही कारणंही होती, अशी माहिती समोर येते.
90 च्या दशकात दाऊद आणि राजन एकत्र काम करत होते. मात्र, डी कंपनीमध्ये सुनील सावंत उर्फ सावत्या आणि शरद शेट्टी यांचा प्रभाव वाढू लागल्यानंतर समीकरणं बदलू लागली. या दोघांनी दाऊदकडे राजनविरोधात कान भरल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, 1992 मधील जेजे रुग्णालयातील शूटआऊटमध्ये छोटा राजनला दूर ठेवण्यात आलं. या घटनेनंतर राजनच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या हत्याही झाल्या, ज्यामुळे दोघांतील दरी आणखी वाढली.
या सर्व घडामोडींमुळे दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील नातं पूर्णपणे तुटलं आणि अंडरवर्ल्डमध्ये दोन वेगळ्या गटांची सुरुवात झाली.
