पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या ५ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रुपीनगर, फुरसुंगी येथे रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २५) याचा सहा इसमांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला होता.
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे आणि पोलीस अंमलदार पवन भोसले यांना गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी ओंकार उर्फ ओम प्रमोद मोरे (वय २३), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २०) आणि अरुण अनिल यादव (वय २०) हे मस्तानी तलावाजवळ लपून बसले होते. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्यांना पकडलं. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे आरोपी अरुण यादव याला दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पो. हवा. सुरेंद्र जगदाळे, पो. हवा. नितीन मुंढे, पो. हवा. कुसाळकर, पो. हवा. अमोल घावटे, पो. अंमलदार पवन भोसले यांनी सदरची कामगिरी केली आहे.
