पुणेमहाराष्ट्र

IT सेक्टर धोक्यात? बेरोजगारी आणि मंदीबाबत धक्कादायक भविष्यवाणी

कोरोनानंतर जग सावरतंय असं वाटत होतं… पण आता जगातील मोठमोठे अर्थतज्ज्ञ एक नवीन इशारा देतायत…
आणि तो इशारा आहे — “भीषण जागतिक मंदीचा!”
हो… अमेरिकेपासून युरोपपर्यंत… आणि त्याचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
सर्वात धक्कादायक भविष्यवाणी केली आहे गॅरी शिलिंग यांनी.
हे तेच अर्थतज्ज्ञ आहेत ज्यांनी 1969 ची मंदी आधीच ओळखली होती.
आता ते म्हणतायत — 2026 च्या अखेरीस अमेरिकेत मंदी येणं “जवळपास निश्चित” आहे!
कारण काय?
हाऊसिंग मार्केट थांबलंय…
कंपन्यांची गुंतवणूक कमी होतेय…
लोक खर्च करायला घाबरतायत…
आणि वरून AI मध्ये झालेल्या मोठ्या गुंतवणुकीचा “बबल” फुटण्याची भीती!
अब्जाधीश गुंतवणूकदार लिओन कूपरमन यांनीही स्पष्ट सांगितलं —
“शेअर बाजार धोकादायक पातळीवर आहे.”
आता प्रश्न असा…
याचा भारतावर काय परिणाम होणार?
तज्ज्ञ सांगतात… भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे कारण ती मुख्यतः देशांतर्गत बाजारावर चालते.
म्हणजे भारत पूर्णपणे कोसळणार नाही… पण धक्के बसणार हे नक्की.
सर्वात मोठा धोका आहे IT सेक्टरला!
कारण भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा व्यवसाय अमेरिका आणि युरोपवर अवलंबून आहे.
जर तिकडे मंदी आली… तर नवीन प्रोजेक्ट्स थांबतील…
Hiring कमी होईल…
काही कंपन्या पगार कपात करतील…
आणि फ्रेशर्ससाठी नोकऱ्या मिळणं आणखी कठीण होऊ शकतं.
फक्त IT नाही…
टेक्सटाइल, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टवर चालणारे उद्योगही दबावाखाली येऊ शकतात.
यात आणखी एक मोठं संकट म्हणजे रुपया.
जर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून पैसा काढला… तर रुपया कमकुवत होईल…
पेट्रोल-डिझेल महाग होईल…
आणि महागाई पुन्हा वाढू शकते.
पण सगळंच काळं चित्र नाही…
सरकारची मोठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स…
RBI चं सावध धोरण…
आणि भारताची मजबूत अंतर्गत बाजारपेठ…
ही भारतासाठी मोठी ताकद मानली जातेय.
पण एक गोष्ट स्पष्ट आहे…
पुढची दोन वर्षं जगासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असणार आहेत.
आणि जर जागतिक मंदी आली…
तर तिचा परिणाम तुमच्या नोकरीपासून EMI पर्यंत… आणि शेअर बाजारापासून महागाईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर दिसू शकतो!