मुंबई

भाजपचे उमेदवार पाडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात काम करा;”राज ठाकरे” यांचा मनसैनिकाना आदेश

मुंबई (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) अद्याप कोणती भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. परंतु,मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कामाला लागा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे दिसणार आहेत, हे नक्की झाले आहे. मात्र, मनसे निवडणूक लढणार की नाही याबाबतही अद्याप सस्पेन्स कायम ठेवला होता. मोदीमुक्त भारत होण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हे मी आधीपण बोललो होतो. यापुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देश अशी आगामी लोकसभा निवडणूक असेल. तसेच, यापुढे मी ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहा यांच्या विरोधातल्याच सभा असतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले. याचबरोबर, भाजपाचे लोक तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या. त्यांनी देशाला गेली पाचवर्षे लुटले आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही त्यांना लुटले तर काही हरकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. भाजपाकडून चौकीदारचे कॅम्पेन सुरु आहे, निवडणूक भारताची आहे की नेपाळची? असा सवाल करत राज ठाकरे यांनी भाजपाकडून गेल्या दोन दिवसांपासून सुर झालेल्या मै भी चौकीदार हूं, या कॅम्पेची शेलक्या शब्दात खिल्ली उडवली. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे, खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रचार भाजपाकडून करण्यात येत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 months ago

Hey there this is kinda of off topic but I was wondering
if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML.

I’m starting a blog soon but have no coding skills so I wanted to get advice from someone
with experience. Any help would be greatly appreciated!

4 months ago

As razões mais comuns para a infidelidade entre casais são a infidelidade e a falta de confiança. Em uma época sem telefones celulares ou internet, questões de desconfiança e deslealdade eram menos problemáticas do que são hoje.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x