पुणे

भोसरी मतदारसंघात “अमोल कोल्हे” यांच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद शिरूर मतदारसंघात प्रचारात रंगत

भोसरी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी मतदारसंघात आज बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अभिनेते अमोल कोल्हे यांची ‘क्रेझ’ यावेळी दिसून आली.


या रॅलीत राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे. अभिनयासह अमोल कोल्हे आता राजकारणात सक्रीय झालेत. शिरूर लोकसभेची राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. संपूर्ण मतदार संघात सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

शिरूर मतदारसंघात येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदार संघात कोल्हे यांनी आज बाईक रॅली काढून जोरदार प्रचार केला. निगडी, रूपीनगर, तळवडे, सानेवस्ती, मोशी, शाहूनगर,भोसरी परिसरात रॅलीव्दारे अमोल कोल्हे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांमध्ये कोल्हे यांचा फोटो काढण्यासाठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
wow gold
9 months ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

5 months ago

¿Cómo detectar a un cónyuge que engaña en un matrimonio? Estos son algunos ejemplos de parejas infieles.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x