पुण्यातील एका जत्रेतून खरेदी केलेल्या चादरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण ही चादर धुतल्यानंतर त्यावर ‘Made in Pakistan’ असं लेबल आढळलं!
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड परिसरात मोरया गोसावी मंदिराजवळ भरलेल्या संकष्टी चतुर्थी जत्रेत एका महिलेने ही चादर खरेदी केली होती. सुरुवातीला काहीच संशय आला नाही. मात्र घरी जाऊन चादर धुतल्यानंतर त्यावर पाकिस्तानमध्ये बनविल्याचे लेबल दिसले.
महिलेने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच तो व्हायरल झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
ही चादर नेमकी कुठून आली? जत्रेत ती कोणी विकली? आणि यामागे मोठं वितरण जाळं कार्यरत आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
या प्रकरणामुळे स्थानिक बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या स्रोताबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.”
पुण्यात खळबळ! जत्रेत विकली ‘Made in Pakistan’ चादर, धुतल्यावर उघड झालं सत्य
