पुणे

पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरीसुपा घाटात ट्रकवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद : ३ दिवसात गुन्हा उघड

यवत (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

यवत पोलीस स्टेशन हद्दीत चौफुला-मोरगाव रोडवर सुपा घाट येथे ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघे चालक यांना ट्रकसह पळवून अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकसह त्यामधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरणा-या टोळीतील ८ दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने ताब्यात घेवून ३ दिवसात दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक २५/३/२०१९ रोजी सकाळी ११.०० वा. चे सुमारास रामप्रसाद राठोड रा.राजस्थान हे त्यांचे ताब्यातील चौदा टायर ट्रक नंबर आरजे १७ जी.ए. ६७२८ यामध्ये गव्हाच्या गोण्या राजस्थान ते गोवा असे घेवून जात असताना केडगाव चौफुला-मोरगाव रोडवर सुपा घाटाचे पहिल्या वळणावर अज्ञात चोरट्यांनी त्यांचे ट्रकला बिगर नंबरची वॅगनआर कार आडवी लावून खाली उतरुन ट्रक चालकास दमदाटी करुन ट्रकमधील दोघे चालक यांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेवून त्यांना वॅगनकारमध्ये पळवून नेवून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून ट्रक व त्यामधील ३१५ गव्हाची गोणी असा एकूण १६,९३,०००/- चा माल चोरुन नेला व ट्रकचे दोघे चालक यांना तिसरे दिवशी बारामती येथे निर्जन ठिकाणी सोडून दिले होते. त्याबाबत रामप्रसाद राठोड यांनी दिनांक २८/३/२०१९ रोजी यवत पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा छडा लावणे हे पोलीसांसमोर एक मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने यवत पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथकाकडून पुणे, सातारा व सोलापूर जिल्हयात गुन्हयाचा तपास चालू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे नेमलेले पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूर येथील सागर अंबादास चव्हाण व त्याचे साथीदारांनी टूक लुटल्याची माहिती मिळालेवरुन १)सागर अंबादास चव्हाण वय २५ वर्षे रा.मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूर २)मंगेश उर्फ पप्पू राजेंद्र चव्हाण वय २६ वर्षे रा. क-हावाघज ता.बारामती जि.पुणे ३)सुरज लक्ष्मण गाडे वय २१ वर्षे रा.सावंतवाडी ता.बारामती जि.पुणे ४)रेवणनाथ प्रभाकर जाधव वय २६ वर्षे रा.विट ता.करमाळा जि.सोलापूर ५)उमेश मधुकर काळे वय वय २७ वर्षे रा.वाशिम ता.कर्जत जि.अहमदनगर ६)शेखर सुभाष शिंदे वय २४ वर्षे रा.सांगवी ता.बारामती जि.पुणे ७)सचिन महादेव गेजगे वय ३१ वर्षे रा.मांडवे ,ता.माळशिरस जि.सोलापूर ८)महेश मारुती पेड़कर वय ३६ वर्षे रा.फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी संगनमताने मिळून ट्रकवर दरोडा टाकून चोरलेल्या गव्हाच्या गोण्या महेश पेड़कर याचे मध्यस्थीने नातेपुते येथे विकून मोकळा ट्रक हा करमाळा जि.सोलापूर येथे निर्जन ठिकाणी सोडून दिल्याचे सांगितले. आरोपींकडून गुन्हयात वापरलेली वॅगनआर कार, स्कार्पिओ जीप तसेच चोरलेला ट्रक व गुन्हयातील माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने, सहा.उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, अनिल काळे , रवि कोकरे , महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, प्रविण मोरे, राजू मोमीन, बाळासाहेब खडके यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे.
यातील आरोपी रेवणनाथ जाधव याचेवर दौंड पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी उमेश काळे याचेवर इंदापूर पोलीस स्टेशनला वाहनात प्रवासी म्हणून बसवून लूटमार केलेबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने यापूर्वी अटक केलेले होते.
आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे हे करीत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

Unquestiօnably imagine that that you stated. Your favourіte reasonn appeared to bе аt tһe net
thе eаsiest thing to have in mind of. I say to үou,
I definitely get annoyed whilat folks consider issues thаt
thewy just do not understand ab᧐ut. You controllled to hit the nail ᥙpon the top aѕ weⅼl as defined out the entire thing with no need side-effects
, other people could take a signal. Will likelу be agaіn to ɡet more.
Thank you http://yeshicai.com/comment/html/?103107.html

wow gold
11 months ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

7 months ago

Teraz, gdy wiele osób korzysta ze smartfonów, możemy rozważyć pozycjonowanie telefonów komórkowych za pośrednictwem sieci bezprzewodowych lub stacji bazowych.

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x