पुणे (सागर बोदगिरे- रोखठोक महाराष्ट्र न्युज)
गुलदस्ता, चिनू, बर्नी अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या शिवलीला फिल्म्सच्या वतीने ज्येष्ठ नेते ‘छगन भुजबळ’ यांच्यावर जीवनपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. मा. छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नेते असले तरी ते माणूस म्हणून कसे आहेत ? त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेले अनेक निर्णय कोणत्या परिस्थितीमध्ये घेतले? त्यांचे परिणाम त्यांच्या आयुष्यावर कशा प्रकारे झाले? अशा अनेक गोष्टींचा मागोवा या चित्रपटाच्या आधारे घेण्यात येणार असल्याची माहिती शिवलीला फिल्म्सचे संचालक व चित्रपटाचे दिग्दर्शक शिवम लोणारी यांनी दिली.
या विषयी बोलताना दिग्दर्शक शिवम लोणारी म्हणाले की, मा. छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनविताना राजकारण हा सर्वात महत्वाचा भाग असला तरी, राजकारण्याच्या पुढे देखील प्रत्येकाचे वेगळे आयुष्य असते. सामाजिक जीवनामध्ये वावरणारा माणूस हा नेहमीच खाजगी जीवनामध्ये अतिशय वेगळा असू शकतो. त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांनी घेतलेले अनेक निर्णयांचा दूरगामी परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील अनेक पैलू अव्यक्तच राहिले, त्या अव्यक्त पैलूना घेवूनच या चित्रपटाची निर्मिती आम्ही करत आहोत.
या चित्रपटात करण जाधव, प्रसन्न जोगदेव, अर्जुन प्रधान आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाचे छायांकन अथर्व वाघ तर संकलन नीरज वळसंगकर करणार आहेत. त्याबरोबरीने कथा शिवम लोणारी व चिंतन मोकाशी यांच्या कथेबरोबरीने संवाद लेखन अभिराम भडकमकर करत आहेत. चित्रपटाचे संगीत मानस माळी करणार असून क्रिएटीव्हज श्रीपाद जाधव करणार आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन शंतनू कुलकर्णी करणार असून ग्राफिक्स व व्हीएफएक्सची जबाबदारी विराज पंध्ये सांभाळणार आहेत.
चित्रपटाचा मुहूर्त ११ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार असून हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
—-

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.