पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
नुकतेच महानगरपालिकेने एक पत्र अधिकाऱ्यांना पाठवले असून त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे व सोळा तारखेला होणार्या पंतप्रधानांच्या सभेसाठी तयारी करावी व त्याची गोपनीयता बाळगावी जास्त चर्चा होऊ देऊ नये व प्रसिद्धी माध्यमांना सुगावा लागू देऊ नये असेही ही बजावण्यात आले आहे. पंतप्रधान येणार म्हणून सुविधा देताय पुणेकरांना सुविधा देण्यात कुचराई का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा महत्त्वाची हे आम्हास कळू शकते परंतु गळणाऱ्या पाईपलाईन, गटारे यांची कामे करावीत, अतिक्रमणे काढावीत, रस्त्याला पडलेले खड्डे बुजवावेत असे कामाचे स्वरूप या पत्रामध्ये आहे पुणेकर रोज खड्ड्यातून गेले तरी चालतील त्यांना त्रास झालेला चालेल पण पंतप्रधानांना पुणे चकाचक वाटलं पाहिजे यासाठी सत्ताधारी भाजप जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव आणत आहेत असे स्पष्टपणे यातून दिसते असे सांगून चेतन तुपे पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नावाखाली विविध भागांमध्ये विकासाची कामे करून तिथल्या मतदारांना आकृष्ट करण्याचाच हा एक प्रकार आहे
जर पाणी गळती आहे गटारे खराब आहे तर रस्त्याला खड्डे आहेत अतिक्रमणे आहेत तर ती यापूर्वी का काढली नाही असा आमचा या सत्ताधारी भाजपच्या सर्वांना सवाल आहे त्यामुळे निश्चितच हा आचारसंहितेचे उल्लंघन आणि भंग आहे आणि सरकारी यंत्रणेला हाताशी घेऊन त्यांच्यावर दबाव टाकून निवडणुकीत काम करण्याचं षडयंत्र सत्ताधारी भाजप करत आहेत
याविरोधात आम्ही आचारसंहिता भंगाच्या स्वरूपाचा गुन्हा देखील निवडणूक आयोगाकडे नोंदणी त्याची दाद मागणार आहोत, स्पीड ब्रेकर पीएम येणार म्हणून नियमानुसार करावेत आणि इतरवेळी सामान्य पुणेकर नागरिकांनी काय धक्के खात रहावे का? असा सवाल चेतन तुपे यांनी केला आहे.
आचारसंहितेची ऐशीतैशी…… पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नावाखाली विकास कामे करण्याचा घाट सामान्य पुणेकरांचे हाल, चेतन तुपे यांचा आरोप
Related tags :
I ցо to ssee daily a feеw web pages and blogs to reaԁ
posts, except thjis webѕite offers qualitʏ based articlеs. https://natchez-history.com/nhodp/index.php/User:VonnieVillegas
O monitoramento de telefone celular é uma maneira muito eficaz de ajudá – Lo a monitorar a atividade do telefone celular de seus filhos ou funcionários.