शिरुर

शिरूर लोकसभा मतदारसंघ विधानसभानिहाय आकडेवारी….. डॉ. अमोल कोल्हे यांचा 58,483 मताधिकक्याने विजय जुन्नर व शिरूरची कोल्हेना खंबीर साथ तर भोसरी व हडपसर मधून आढळरावांना आघाडी

रोखठोक महाराष्ट्र न्यूज – (अनिल मोरे)

जुन्नर अन शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे  58 हजार 483 मताधिक्याने विजयी झाले. कोल्हे यांना शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. तर शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना -भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून आघाडी राहिली. तर वंचित बहुजन आघाडीचे राहुल ओव्हाळ यांनी 38070 मते घेतली. तर, नोटाला 6051 मते पडली.

डॉ. अमोल कोल्हे यांनी जायंट किलर ठरत तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. तब्बल 58 हजार 483 एवढे मताधिक्य घेत कोल्हे यांनी बाजी मारली. कोल्हे यांच्या रूपाने शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडे खासदारकी आली आहे. तसेच मराठी सिने-नाट्य सृष्टीतील पहिला खासदार होण्याचा मान कोल्हे यांना मिळाला. शिरूरमध्ये 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी डॉ. अमोल कोल्हे यांना 6 लाख 35 हजार 830 मते मिळाली. तर आढळराव पाटील यांना 5 लाख 77 हजार 347 मते मिळाली.

विधानसभानिहाय आकडेवारी –

जुन्नर

डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 13 हजार 182

शिवाजीराव आढळराव पाटील – 71 हजार 631

कोल्हे आघाडी – 41 हजार 551

आंबेगाव

डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 7 हजार 781

शिवाजीराव आढळराव पाटील – 82 हजार 84

कोल्हे आघाडी – 25 हजार 697

खेड-आळंदी

डॉ. अमोल कोल्हे – 99 हजार 583

शिवाजीराव आढळराव पाटील – 92 हजार 137

कोल्हे आघाडी – 7 हजार 446

शिरूर

डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 20 हजार 37

शिवाजीराव आढळराव पाटील – 93 हजार 732

कोल्हे आघाडी – 26 हजार 305

भोसरी

डॉ. अमोल कोल्हे – 88 हजार 259

शिवाजीराव आढळराव पाटील – 1 लाख 25 हजार 336

आढळराव आघाडी – 37 हजार 77

हडपसर

डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 5 हजार 712

शिवाजीराव आढळराव पाटील – 1 लाख 11 हजार 82

आढळराव आघाडी – 5 हजार 370

मागील निवडणुकीत सर्वच मतदारसंघातून आढळराव पाटील यांना आघाडी होती हडपसर मधून 55 हजार मतांची आघाडी होती पण कोल्हे ही आघाडी तोडण्यात यशस्वी झाले, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, प्रदीप कंद, चेतन तुपे यांची रणनीती यशस्वी ठरल्याने आढळराव यांच्यावर मात करण्यात डॉ.कोल्हे सरस ठरले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x