पुणे

अनाथ मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्याचा संजय जाधव यांचा आदर्श घ्यावा : संजय शिंदे यांचे आवाहन

सामाजिक बांधिलकी जपत सरपंच संजय जाधव यांनी आपली राजकीय वाटचाल केली,अनाथ बालक व वृद्ध यांच्यासमवेत वाढदिवस साजरा करून त्यांनीं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य संजय शिंदे यांनी हडपसर काळेपडल येथे बोलताना केले.

हांडेवाडीचे माजी सरपंच व युवनेते संजय जाधव यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या मित्रपरिवाराकडून धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या अनाथआश्रम व वृद्धाश्रमात शालेय साहित्य,फळे वाटप,कपडे साहित्य वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
सकाळी हांडेवाडी येथील संपर्क कार्यालयात आमदार बाबुराव पाचर्णे,
काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप,पंचायत समिती उपसभापती सचिन घुले,भाजप नगरसेवक संजयतात्या घुले,जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरुंगे,माजी नगरसेवक फारूक इनामदार,महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड,युवानेते सुफियांन इनामदार, कलेश्वरभाऊ घुले इरफान शेख, प्रणयराजे भोसले यांच्यासह विविध पक्षीय मान्यवरांनी संजय जाधव यांचे अभिष्टचिंतन केले.
दुपारी हडपसर येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या अनाथ बालके व वृद्धआश्रमात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मारुतीआबा तुपे,माजी सरपंच दत्तोबा बांदल, राजेंद्र भिंताडे, विक्रम घाडगे,राजेंद्र दादा शेवाळे, राजेंद्र भानगिरे,काँग्रेस युवक अध्यक्ष सूरज शेवाळे,सुधीर जाधव,उत्तम फुलावरे,बाळासाहेब हांडे,विकी जाधव,संदीप बांदल,जितेंद्र मद्रेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय शिंदे पुढे म्हणाले ‘ आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत स्वखर्चाने विविध योजना गावासाठी संजय जाधव यांनी हांडेवाडी परिसरातील जनतेकरिता राबवल्या,युवा उद्योजकांना त्यांनी मदत करून समाजातील विविध घटकांकरिता निस्वार्थ भावनेने काम केले आहे,त्याची पोहोचपावती जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संजय शिंदें यांनी यावेळी व्यक्त केला.
सरपंच संजय जाधव यांच्या वाढदिवसानिम्मित विविध उपक्रम त्यांच्या मित्रपरिवाराकडून आयोजित करण्यात आले होते,यावेळी पंचक्रोशीतील गावांचे आजी माजी सरपंच व पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
3 months ago

I like this web site it’s a master piece!
Glad I found this ohttps://69v.topn google.Raise your business

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x