पुणे

लग्न कार्यालयात दागिने चोरणारी बंटी बबली टोळी जेरबंद : सुमारे १ किलो सोन्याचे दागिने हस्तगत : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)

पुणे जिल्हयातील मंगल कार्यालयातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करणारे २ आरोपींकडून १७ गुन्हे उघडकीस आणून सुमारे ९२ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम ५,२७,०००/- , १० मोबाईल व एक कार असा सुमारे ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (एल.सी.बी.) शाखा व सासवड पो.स्टे. कडून जप्त केल्याची माहीती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे जिल्हयामध्ये मंगल कार्यालयातील वर, वधु व वऱ्हाडी मंडळीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी होण्याचे प्रकार वाढल्याने अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांना शोधून काढण्याकरीता पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना व पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. तसेच अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्या संदर्भात वेळोवेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी देखील सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहा.पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, जीवन राजगुरू, दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमण, महेश गायकवाड, निलेश कदम, श्रीकांत माळी, राजु मोमीन, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, प्रमोद नवले, महिला कर्मचारी ए.एन.कोरपड, एस.पी.मोरे यांचे पथक तयार केलेले होते. सदर पथकाने गुन्हयाची माहीती घेवून तेथील सीसी टिव्ही फूटेजचे विश्लेषण करून आरोपीचे फोटो प्राप्त केले. गुन्ह्याचे तपासात सदर पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, मंगल कार्यालयातील गडबडीचा फायदा घेवून वऱ्हाडी मंडळीचे सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरी करणारे नवरा बायको यवत हद्दीतील समृध्दी मंगल कार्यालयात त्यांचेकडील स्विप्ट कारसह येणार आहे. अशी माहीती मिळाल्यातर सदर पथकाने त्या ठिकाणी वेशांतर करून सापळा रचून आरोपी विलास मोहन दगडे वय २८ वर्षे व त्याची पत्नी जयश्री विलास दगडे वय २५ वर्षे दोघे रा.खुळेवाडी, चंदननगर, पुणे मूळ रा.शेलगाव वांगी, ता.करमाळा, जि.सोलापूर यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांचे ताब्यात दोन मोबाईल, रोख ४,१२,०००/- रुपये, चार तोळे सोन्याचे दागिने व स्विफ्ट डिझायर कार असा ऐवज मिळाला होता. सदरचा माल हा त्यांनी सासवड रोड काळेवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयातून चोरल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करून पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले यांनी आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेवून सासवड पो.स्टे. व पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे स्टाफने केलेल्या पुढील तपासामध्ये आरोपीचे घरात लपवून ठेवलेले चोरीचे सुमारे ८८ तोळे सोन्याचे दागिने, १,१५ ,०००/- रोख रक्कम असा ऐवज मिळून आला. आरोपींनी सदरचा माल हा लोणीकाळभोर, उरुळी देवाची, सासवड, वालचंदनगर, भांडगाव, तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्यातील राहु, केडगाव चौफुला, माळेगाव, वाघोली, राजगड, शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील लग्न कार्यालयातून चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. आरोकडे केलेल्या तपासात आरोपी पुणे ग्रामीण जिल्हयात एकुण १७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
अटक आरोपींकडून सुमारे ९२ तोळे सोने, रोख रक्कम रूपये ५,२७,०००/- , १० मोबाईल हॅंडसेट व एक स्विप्ट डिझायर कार असा सुमारे ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरबोले हे करीत आहेत.

गुन्हयाची पद्धत :
आरोपी सोलापूर जिल्हयातील शेलगाव वांगी येथील असून पुणे शहर व परिसरातील कार्यालयात चोरी करणे सोपे जावे म्हणून चंदननगर खुळेवाडी येथे राहत होते. लग्न तिथीची माहीती काढून ते त्यांचेकडील स्वीप्ट डिझायरमध्ये उच्चभ्रू पोषाख व दागिने घालून प्रवेश करायचे. वऱ्हाडी मंडळीमध्ये सामील होवून वधूवर पक्षाचे खोलीत प्रवेश करून दागिने किंमती ऐवज कोठे ठेवला आहे याची माहिती घेवून गडबडीचे वेळी ते घेवुन पसार व्हायचे.

तपास पथकास बक्षिस जाहीर :
पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी सांगीतले की, नववधुच्या जीवनात लग्न हा अत्यंत भावनिक सोहळा असतो. लग्नातील दागिने तयार करणे साठी आईवडिलांनी आयुष्याची पुंजी जमा केलेली असते. अशा लग्न सोहळ्यातच दागिने चोरीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी आरोपी जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत केल्याने या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस पथकास ३५ हजार रूपयाचे बक्षिस जाहीर करत आहे.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

I am genuinely thankful to the holder of this web site who has shared
this impressive paragraph at at this time.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x