पुणे

पुणेकरांचा मोकळा श्वास ; हेल्मेट सक्तीसंदर्भातील पोलिसांच्या कारवाईला शहरी भागात स्थगिती- मुख्यंमंत्र्यांनी दिल्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना- आ. माधुरी मिसाळ यांच्या  प्रयत्नांना यश    

पुणे : (रोखठोक महाराष्ट्र न्युज)

 

दुचाकी चालवीत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्या असून यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणा-या कारवाईला स्थगिती मिळाली आहे. यासंदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या.   

याबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रश्नाला वाचा फोडली. याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलिस करित असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका देखील मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य करीत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago
url
6 months ago

Hi! Do you know if they make any plugins to safeguard against
hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any suggestions?

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x