Uncategorizedपुणे

ये दोस्ती हम नाही तोडेंगे ; अत्यंत दुखःद घटना, रायगडावरुन परतताना लोणीकाळभोर जवळ भीषण अपघात, 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू

पुणे: (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)

इर्टिका आणि ट्रकमध्ये धडक होऊन पुण्यातील लोणीकाळभोर जवळ भीषण अपघात झाला. यात 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हे तरुण रायगड पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. लहानपणापासून एकत्र असलेल्या मित्रांनी मृत्यूला पण एकत्र कवटाळले, यवत व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोणीकाळभोर जवळील कदम वाकवस्ती येथे पुणे-सोलापूर महामार्गावर हा अपघात घडला. कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर इर्टिका कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की कारमध्ये प्रवास करणाऱ्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

इर्टिका कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. मृतांमधील सर्वजण यवत (ता. दौंड) परिसरातील आहेत. हा अपघात रात्री 1 वाजेच्या सुमारास झाला. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी रायगडला फिरायला गेले होते. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज अशी मृतांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

环球理财 hqlc.com

1 month ago

I am truly thankful to the owner of this web site who has shared this fantastic piece of writing at at this place.

1 month ago

I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

1 month ago

naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

29 days ago

28 days ago

I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x