पुणे

पुणे बारामती सायकल स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी: खा.अमोल कोल्हे ; सेंट्रल रेल्वेच्या संदेश उप्परने पटकवला प्रथम क्रमांक

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन)

पुणे बारामती सायकल स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी असून बक्षीस मिळेल की नाही या पेक्षा राष्ट्रीय खेळाडूंसोबत सायकल स्पर्धेत सहभागी होण्याचा आंनद मिळतो त्याच बरोबर आत्मविश्वासही वाढतो. शरीर व मन बळकट करण्यासाठी व्ययाम गरजेचा असून या पुढे मनगटातल्या ताकदीवर भविष्य ठरणार आहे. शब्द दिला की काम पुढं नेणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होय असे सांगत खासदार अमोलजी कोल्हे यांनीअजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवार दि. २० जुलै २०१९ रोजी पुणे-बारामती राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते. सायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष असून ही स्पर्धा एकूण सहा गटात घेतली गेली. सायकल रॅलीचे उद्घाटन शनिवारवाडा, पुणे येथे झाले तर स्पर्धेला सुरुवात हडपसर येथे करण्यात आली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे ग.दि.मा सभागृहात खासदार अमोलजी कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कोल्हे बोलत होते.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद लाभला असून, देशभरातील ३५० सायकलस्वार यामध्ये सहभागी झाले. कर्नाटक, आंध्रप्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण-मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व रेल्वे, एअरफोर्स, तामिळनाडू, गुजरात, मध्य रेल्वे, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, विद्या प्रतिष्ठानचे सचिव द. रा. उंडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, मि. इंडिया व मि. युनिव्हर्स महेश हगवणे, एशियन सायकलिंग फेडरेशनचे सचिव ओंकार सिंग, आयर्नमॅन दशरथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या माध्यमातून वाहतूक, आरोग्य, प्लास्टिक बंदी, बेटी बचाव बेटी पढाव आदी विषयांवर सामाजिक संदेश देण्यात आला. युवकांना प्रेरणा देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे तसेच सायकल प्रचार व प्रसार करुन प्रदूषणमुक्त वातावरण तयार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात येते. असे सांगितले.
यानंतर स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धंकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना एकूण पाच लाखांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेचे संयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी केले.

स्पर्धेचा निकाल
( कंसात अंतर पार करण्यासाठी नोंदवलेला वेळ दिला आहे)
राष्ट्रीय स्तरावरील पुणे ते बारामती (१२० कि. मी.) पुरुषांसाठीच्या स्पर्धेमध्ये याचा प्रथम क्रमांक सेंट्रल रेल्वेचा संदेश उप्पर याने पटकावला. ( २ तास ५४ मिनीट ०१ सेकंद )
द्वितीय क्रमांक सेंट्रल रेल्वेचा श्रीधर सौनूर मिळवला. ( २ तास ५४ मिनीट ०१ सेकंद ) तर यलगुरव यलकुट्टी कर्नाटक( २ तास ५४ मिनीट ०२ सेकंद ) हे तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.
सेंट्रल रेल्वेचा संदेश उप्पर याने किंग ऑफ घाट हा किताब मिळाला असून, त्याने दिवे घाट सर्वात आधी पार केला.

राज्य स्तरावरील घाटाचा राजा स्पर्धेत सांगलीचा दिलीप माने
यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

राज्यस्तरीय पुणे ते बारामती (१२० कि. मी.) पुरूष गटातील स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक सांगलीचा दिलीप माने याने पटकावला.(२ तास ५४ मिनिटे ०७ सेकंद)
द्वितीय क्रमांक पुण्याच्या हनुमान याचोपडे याने मिळवला.( २ तास ५४ मिनिटे ५६ सेकंद)
तृतीय क्रमांक मुंबईचा विनीत सावंत याने मिळवला.(२ तास ५४ मिनिटे ५७ सेकंद)

राज्यस्तरीय सासवड ते बारामती एमटीबी सायकल पुरुषांसाठी खुल्या (८५ किमी) स्पर्धेमध्ये
नाशिकच्या भारत सोनवणे याचा प्रथम क्रमांक, (२ तास ३५ मिनिटे १५ सेकंद) सांगलीच्या सागर अमदे द्वितीय क्रमांक(२ तास ३५ मिनिटे ४२ सेकंद) तर अहमदनगरच्या विकास रोठे यला तृतीय क्रमांकाने (२ तास ४१ मिनिटे ५७ सेकंद) गौरविण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील माळेगाव ते बारामती मुलींसाठी (१८ वर्षावरील वयोगट) (१५ किमी) स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक कर्नाटकच्या मेघा गुगड (२३ मिनिटे ११ सेकंद)
द्वितीय क्रमांक कर्नाटकच्या सोमय्या अंतनूर ( २३मिनिटे २० सेकंद)
तृतीय क्रमांक कर्नाटकच्या सावित्री हेबल्लटी ( २२ मिनिटे २० सेकंद) बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा स्तरावरील माळेगाव ते बारामती मुलींसाठी १४ ते १६ वर्षे वयोगट) (१५ किमी) स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक बारामतीची राधिका गराडे , ( ३६ मिनिटे २३ सेकंद)
द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवडची सिद्धी शिर्के (२६ मिनिटे ५२ सेकंद)
तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवडची प्रगती भगत (३० मिनिटे ४४ सेकंद) बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा स्तरावरील माळेगाव ते बारामती मुलांसाठी (१४ ते १६ वर्षे वयोगट) (१५ किमी) स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक पुण्याचा पारस नातू (२३ मिनिटे ०१ सेकंद)
द्वितीय क्रमांक पुण्याचा पार्थक देशमुख (२३ मिनिटे ०५ सेकंद)
तृतीय क्रमांक पिंपरी चिंचवडचा हर्ष कोरडे ( २३ मिनिटे ५३ सेकंद) बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा स्तरावरील माळेगाव ते बारामती मुलांसाठी MTB (१७ ते १८ वर्षे वयोगट) (१५ किमी) स्पर्धेमध्ये

प्रथम क्रमांक पुण्याचा केशव बंजातरी (२१ मिनिटे ०८ सेकंद)
द्वितीय क्रमांक पुण्याचा रोहित पाटोळे (२१ मिनिटे ०८ सेकंद)
तृतीय क्रमांक पुण्याचा सौरभ मंदोरीया ( २१ मिनिटे ०८ सेकंद) बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील पुणे ते सासवड
पुरुषांसाठीच्या स्पर्धेमध्ये याचा प्रथम क्रमांक सेंट्रल रेल्वेचा संदेश उप्पर याने पटकावला. ( ३३मिनीट ४३ सेकंद )
द्वितीय क्रमांक सेंट्रल रेल्वेचा श्रीधर सौनूर याने मिळवला. ( ३३ मिनीट ४४ सेकंद ) तर कर्नाटकचा यलगुरव यलकुट्टी ( ३३ मिनीट ४४ सेकंद ) हे तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.

राज्य स्तरावरील पुणे ते सासवड
पुरुषांसाठीच्या स्पर्धेमध्ये याचा प्रथम क्रमांक अहमदनगरचा संकल्प थोरात याने पटकावला. ( ३३मिनीट ४५ सेकंद )
द्वितीय क्रमांक सांगलीचा दिलीप माने मिळवला. ( ३३ मिनीट ४६ सेकंद ) तर अहमदनगरचा सौरभ गुंड ( ३३ मिनीट ४६ सेकंद ) हे तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.

0 0 votes
Article Rating
141 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments