मुंबई

विकास रासकर यांची भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड ; हडपसर मतदारसंघात राज्याचे दोन प्रदेशाध्यक्ष

मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे वरिष्ठ नेता तथा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन विकास रासकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय जनसंघ,भाजयुमो पुणे अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य ते भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास झाला आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना रासकर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करून भाजपा नेतृत्वाने पहिल्यांदाच एका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन प्रदेशाध्यक्ष नेमलेले आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशातच, हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा नवीन नवीन चेहरा म्हणून रासकर यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यानी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार संपूर्ण मतदारसंघात केला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात‘ हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घेऊन हडपसर भागात त्याला लोकाभिमुख केले आहे. सर्वात मोठया महाआरोग्य शिबिरातुन मतदारसंघातील अनेक नागरिकांना मोठ्या शस्त्रक्रियासाठी शासकीय आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. होम मिनिस्टर या महिलांच्या कार्यक्रमातून महिलांचे खूप मोठे संघटन उभा केले आहे . हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक नवनवीन उपक्रमाद्वारे घरोघरी जावून कार्यकर्त्याशी गाठीभेटी घेणे रासकर यांनी सुरू केलेले आहे .
शिरूर आणि दौंड या शेजारील मतदारसंघात रासकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच श्रीनाथ म्हस्कोबा शुगरच्या माध्यमातून त्यांची शेतकऱ्यांची नाळ जोडली गेली आहे . मोठा जनाधार असलेला हा नेता विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना भाजपा ओबीसी मोर्चाचा नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे संघटनात्मक पातळीवर नेतृत्व करणार आहेत . विकासाभिमुख, स्वच्छ चारित्र्य आणि प्रतिमा असलेला चेहरा म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघात रासकर यांची चर्चा सुरू असताना ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी भाजपा नेतृत्वाने केली आहे . रासकर यांची प्रदेशाध्यक्षपदाची वर्णी त्यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी फायद्याची आहे की , विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
यावेळी नवनिर्वाचित भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने मागील पाच वर्षांमध्ये ओबीसी समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले आहे . पाच वर्षातील कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा भारतातील ओबीसी समाजाच्या नागरिकांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची संधी दिली आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा फडवणीस सरकारची स्थापना होणार आहे . सत्तर वर्षांमध्ये ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही, तो पाच वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने दिला आहे . ओबीसी समाजाचा अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टी मध्येच असल्यामुळे आणि आजवरच्या समाजच्या कल्याणासाठी घेतलेले योग्य निर्णय महाराष्ट्रमधील गावागावात आणि गावातील प्रत्येक घरांमध्ये पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा कटिबद्ध असणार आहे .
यावेळी कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, संभाजी निलंगेकर पाटील, मदन येरावार,आमदार प्रसाद लाड, पीसीएमसी सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे महानगरपालिका नगरसेवक मारुती तुपे, सोशल मीडिया प्रमुख सुधाकर राजे, प्रदेश सचिव राजाभाऊ नालबंद, सपना राऊत, दिवाकर साहेब, अशोक मुंडे, स्वप्नील शिरसागर, सतीश भिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x