पुणे

सरकार आणि शिवसेना पक्ष कायम खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार : विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विचार

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
यंदाचे वर्ष साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून राज्यभरात साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात कराटे स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबईत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी अकादमी सुरू केली असून अशीच अकादमी पुण्यात सुरू करण्याची सूचना यावेळी ना.डॉ.गोऱ्हे यांनी पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांना केली. याकरिता सरकार आणि शिवसेना पक्ष कायम खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यस जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना संपर्क प्रमुख बाळा कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा शेलार,बाळासाहेब भांडे, रमेश बापू कोंडे, स्वाती ढमाले आणि कार्यक्रमाचे आयोजक मयूर भांडे तसेच खेळाडू उपस्थित होते. तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजू थापा यांचा विशेष सन्मान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, यंदाचे वर्ष साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून राज्यभरात साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे कार्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजाला येणार्‍या काळात दिशा देणारे ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्ताने पुण्यात आज कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने खेळाडूना त्यांच्यातील गुण दाखविण्याचे एक व्यासपीठ मिळाले आहे. तुम्ही लहान असतानाच कराटेचे प्रशिक्षण घेत आहात हे पाहून निश्चित आनंद झाला. कराटेचे प्रशिक्षण घेतल्यास भविष्यात यातून खेळाडू, प्रशिक्षक देशाला आणि समाजाला मिळणार आहेत. त्याचबरोबर स्वतःचे रक्षण करण्यास देखील खेळातून मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

Howdy! I know this is somewhat off topic but I was wondering
if you knew where I could find a captcha plugin for my
comment form? I’m using the same blog platform as yours and I’m having problems finding one?

Thanks a lot!

1 month ago

You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

1 month ago

This was beautiful Admin. Thank you for your reflections.

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x