पुणे

संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डाँ जयप्रकाश घुमटकर

सासवड, ता. ४ः छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डाँ.जयप्रकाश घुमटकर यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी अँड शिवाजी कोलते यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक व साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी सासवड (ता.पुरंदर) येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाचे हे अकरावे वर्षे आहे. श्री कोलते हे सामाजिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षे काम करीत असून, सासवड बार एसोसिएशनच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. वह्या वाटप, अन्नदान, असे सामाजिक उपक्रम ते राबवीत असतात.

साहित्य संमेलनाचे निमंत्रक म्हणून आत्माराम कामथे यांची निवड करण्यात आली आहे. श्री कामथे हे गेली तीस वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करीत असून द्वारकामाई चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजि उपक्रम राबविले आहेत. शिवरी गावातील यमाईदेवी मंदिर जीर्णोद्धारातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. काही वर्षे ते मुंबईला नोकरी करीत असताना सामाजिक बांधिलकीतून त्यांनी कामाला सुरुवात केली.

संमेलनाचे अध्यक्ष पदाचा मान यापुर्वी इतिहास संशोधक अँड अनंत दारवटकर, डाँ प्रभाकर ताकवले, प्रा. नामदेवराव जाधव, अ.रा.कदम, प्रा.गंगाधर बनबरे, बाबासाहेब सौदागर, श्रीराम पच्छिंद्रे, शरद गोरे, डाँ.भा.ल.ठाणगे यांना मिळाला आहे. श्री घुमटकर हे गेली २५ साहित्याच्या क्षेत्रात काम करीत आहेत.

डाँ घुमटकर हे ठाणे जिल्हा आणि शहर परिसरात साहित्य, संस्कृती व सामाजिक कार्यात गेली चाळीस वर्षे सक्रीय सहभागी आहेत. जव्हार येथे झालेल्या २५ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे. चित्रपट कसा काढावा?,तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व,विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. बुध्दधम्माच्या वाटेवर या पुस्तकाने तर साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकालाही त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. काव्यक्षेत्रात गोलघुमट या टोपणनावाने ते कविता लेखन करताता. पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली, पोपटपंची आणि प्रेमासाठी वाट्टेल ते हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

0 0 votes
Article Rating
98 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments