पुणे

पाहण्याच्या वादातून विवस्त्र करून लाथा बुक्क्यांनी मारहाण ; पाच आरोपींना अटक, हडपसर मांजरी मधील घटना

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून झालेल्या वादात हडपसर परिसरातील १६ वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने नग्न करून कोयत्यासह बेल्ट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या तोंडावर टोळक्याने मुत्रविसर्जन केले. हा धक्कादायक प्रकार १२ मार्च रोजी मांजरी परिसरात घडला. मारहाण झालेला मुलगा  सध्या बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी विनीत सूर्यकांत बिरादार (वय, १९ रा. भेकराईनगर),  शुभम राजाभाऊ जाधव (वय १९ रा.समर्थ नगर पिंपरी-चिंचवड) देविदास ऊर्फ देवा घनशाम पाहणे (वय, २१, रा. काळेपडळ हडपसर ) भारत विशाल राठोड (वय, २१ रा. कुंजीर वस्ती ) सलीम कलिंदर शेख (वय, २२ रा.घुले वस्ती मांजरी ) या पाच जणांना ताब्यात  घेतले आहे. याबाबत मारहाण झालेल्या मुलाच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण झालेला मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत गोपाळपट्टी परिसरात राहतो. १२ मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरच्यांना सांगून तो बाहेर गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्यामुळे त्याच्या घरच्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तर इकडे हडपसर बीट मार्शलला एक मुलगा बेशुद्धावस्थेत मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ मिळून आला होता. त्याला उपचारासाठी त्यांनी ससून रुग्णालयात  दाखल केले होते. परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. 

दरम्यान मारहाण झालेल्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमावरून पोलिसांच्या हाती लागला. यावेळी पोलिसांनी मुलाच्या घरच्यांना बोलावून व्हिडिओ दाखवला तेव्हा तो मुलगा त्यांच्यात असल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेने प्रत्येक्ष ससून रुग्णालयात जाऊन पाहिले असता मुलगा बेशुद्ध असल्याचे आढळून आला. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x