पुणे

प्रभाग क्र 22 मध्ये युवकांकडून केली फवारणी महापालिकेला केली मदत,  नागरिकांमध्ये समाधान ; पोलिसांच्या मदतीला युवक धावले

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन

पुणे (प्रतिनिधी)

महापालिकेचे यंत्रणेवर आधारीत न राहता 15 नंबर परिसरातील युवकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून परिसरात औषध फवारणी केली त्यांच्या कर्तृत्वामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन असताना प्रभाग क्रमांक 22 मध्ये महापालिकेच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे, महापालिकेवर प्रचंड ताण आलेला आहे, त्यामुळे 15 नंबर परिसरातील येथील युवक सचिन मोरे, सागर चव्हाण, सचिन तांबे, अनिल चव्हाण,  सोमनाथ मोरे, भारत गायकवाड, प्रशांत गायकवाड,  आशिष भूतकर, अजीम सय्यद यांनी पुढाकार घेऊन 15 नंबर परिसरातील जिजामाता  वसाहत सोसायट्या, बैठी घरे परिसरात औषध फवारणी केली त्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जीवनावश्यक वस्तू संपल्या आहेत तसेच भाजीपाला व किराणा साहित्य तुटवडा जाणवत असल्याने महापालिका व शासकीय स्तरावर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशी मागणी या युवकांनी केली आहे.
15 नंबर चौकात पोलीस बंदोबस्त गस्त चालू असून येथे पोलिसांना चहा पाणी पुरविण्याचे कामही येथील श्रीगणेश मित्र मंडळ व जगदंब प्रतिष्ठान कडून केले जात आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x