पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश… वयोवृद्ध कलावंतासाठी एक दिलासादायक बातमी ; साडेबाराशे वयोवृद्ध कलावंतांना सोमवार पासून मानधन मिळणार

मुंबई- राज्यातील ज्या उर्वरित वयोवृद्ध कलावंताचे मानधन थकले होते. आता त्यांच्या बँक खात्यात येत्या सोमवार पासुन मानधन जमा होणार आहे.त्यासाठी सांस्कृतिक कार्य खात्याने दोन कोटी ४४लाख रुपयांची तरतूद केली असून एकूण साडेबाराशे वयोवृद्ध कलावंतांना त्याचा लाभ मिळणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात सध्या महाराष्ट्रातील अनेक लोककलावंत दयनीय अवस्थेत जगत आहे.आज त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.गेल्या एप्रिल महिन्यात २७ हजार वयोवृद्ध कलावंताचे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे थकलेले मानधन सांस्कृतिक कार्य खात्याने त्यांच्या बँक खात्यात जमा केले होते.त्यासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. ऐन संकटाच्या काळात सरकारने खात्यात पैसे जमा केल्याने तेव्हा अनेक कलावंतांनी समाधान व्यक्त केले होते.
त्यानंतर ही सुमारे साडेबाराशे वयोवृद्ध कलावंताचे मानधन देणे अजून बाकी होते.विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा या भागातील अनेक कलावंत या मानधनापासून वंचित होते.यामध्ये बहुतेक नवीन लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.कालच सांस्कृतिक कार्य खात्याने दोन कोटी ४४लाख रुपयांची तरतूद केली असून सोमवार दि.११मे २०२०पासून मानधनापासून वंचित असलेल्या कलावंतांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे.
सप्टेंबर २०१९पासून सुधारित “शासन निर्णया”नुसार पुढील मानधन जमा होणार आहे.
१)”अ”श्रेणीतील कलावंत- तीन हजार १५०/-रुपये.
२)”ब”श्रेणीतील कलावंत- दोन हजार ७००/-रुपये
३)”क”श्रेणीतील कलावंत- दोन हजार
२५०/-रुपये

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x