दिल्ली

चीनची नवी खेळी; भारतीय वृत्तपत्रे आणि वेबसाईट्सवर घातली बंदी

बिजिंग – भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमे प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. अशातच चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय वृत्तपत्रे आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत.
चीनमध्ये सध्या भारतीय टीव्ही चॅनेल्स आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. माहितीनुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केले जाऊ शकते.
दरम्यान, भारताने 59 चिनी ऍपवर बंदी घातल्याने चीनने मंगळवारी भारताविरोधात चांगलाच थयथयाट सुरू केला आहे. भारताच्या या कृतीवर त्यांनी आक्षेप घेत चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची कायदेशीर जबाबदारी भारतावर आहे त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे. भारताने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत चिनी ऍपवर बंदी घातली आहे. त्यांची ही कृती अमेरिकेच्या मानसिकतेचीच आहे, अशी टिपण्णीही चीनकडून केली जात आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x