ठाणे

ठाण्यातील रुग्णांकडून 27 लाख रुपयांची जादाची बिले : बिलांचे ऑडिट करण्याची कारवाई

ठाणे – खासगी रुग्णालयांनी कोविडग्रस्तांची तसेच अन्य रुग्णांची लूट करू नये म्हणून अशा संशयास्पद रुग्णालयांनी वसूल केलेल्या बिलांचे ऑडिट करण्याची कारवाई सध्या सुरू झाली आहे. अशाच ऑडिटमधून ठाण्यातील रुग्णालयांनी विविध रुग्णांकडून 27 लाख रुपयांची जादाची बिले आकारणी केल्याचे निष्पन्न झाले असून ठाणे महापालिकेने हे पैसे रुग्णालयाने संबंधित रुग्णांना परत करावेत, असा आदेश दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संबंधात माहिती देताना सांगितले की, त्यांच्या यंत्रणेने महापालिका हद्दीतल्या विविध रुग्णालयांची एकूण 1752 बिलांची तपासणी केली. त्यातील 196 बिले आक्षेपार्ह असल्याचे आढळून आले. या 196 बिलांमध्ये जादाची आकारणी झाल्याचे लक्षात आले आहे. ही रक्कम 27 लाख रुपये इतकी असल्याचे आढळून आले असून संबंधित रुग्णांना ती बिले परत करण्याचा आदेश महापालिकेने रुग्णालयांना दिला आहे.

0 0 votes
Article Rating
309 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments