पुणे

वैदुवाडी-रामटेकडी स्मशानभूमीची सुरक्षा रामभरोसे : महानगरपालिका प्रशासन इकडे लक्ष देणार का?

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
वैदुवाडी – रामटेकडी येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून अंत्यविधी करण्याच्या लोखंडी जाळ्या तुटल्याने गोर गरीब कुटुंबांना लाकडावर अंत्यविधी करावा लागत आहे, गरिबांना हा आर्थिक भार सोसत नाही याकडे महापालिकेने तातडीने लक्ष घालून स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी आमदार व पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.
वैदुवाडी – रामटेकडी येथील स्मशानभूमी चा वापर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात येथे अंत्यविधी करण्यासाठी असणाऱ्या लोखंडी बॅरिकेट्स तूटल्याने नागरिकांना लाकडावर अंत्यविधी करावा लागत आहे त्यामुळे गोरगरीब कुटुंबाला हा खर्च पेलवत नाही वारंवार महापालिकेला सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, येथील शौचालयाची स्वच्छता केली जात नाही, दुर्गंधीने रोगराईला आमंत्रण मिळत आहे, यासंदर्भात नागरिकांचे प्रश्न लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी आमदार चेतन तुपे पाटील व पुणे महानगर पालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे.

स्मशानभूमी तातडीने दुरुस्त करा अन्यथा आंदोलन..
वैदुवाडी रामटेकडी स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून येथील बॅरिकेट तूटलेले आहेत येथील लोकसंख्या व नागरिकांची गरज लक्षात घेऊन तातडीने सोयीसुविधा पुरवाव्यात व नागरिकांची होणारी कुचंबणा टाळावी गोरगरीब कुटुंबाच्या हालअपेष्टा थांबवावयात अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल.
तुकाराम शिंदे
उपाध्यक्ष – ओबीसी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस