मुख्य

हॅम्बर्ग जर्मनी येथे फुल्ल आयर्नमॅन स्पर्धेत हडपसरमधील डॉ.राहुल झांजुर्णे आणि दशरथ जाधव यांचे नेत्रदीपक यश

डॉ. झांजुर्णे म्हणाले की, हॅम्बर्गमध्ये आयर्नमॅन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये हडपसरमधील डॉ. झांजुर्णे आणि आयर्नमॅन दशरथ जाधव यांनी सहभाग घेतला होता. 4 किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग, 42 किलोमीटर रनिंग स्पर्धा न थांबता एकत्र 16 तासात पूर्ण करायची असे स्वरूप होते. दरम्यान, ६५ वर्षीय उद्योगपती दशरथ जाधव यांनी सलग सहाव्या वेळेस ही स्पर्धा पूर्ण केली आहे.हॅम्बर्ग जर्मनी येथे फुल्ल आयर्नमॅन स्पर्धेत हडपसरमधील डॉ. झांजुर्णे आणि जाधव यांचे नेत्रदीपक यश आले आहे.

हडपसर मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. राहुल झांजुर्णे यांनी ही स्पर्धा दुसऱ्यांदा पूर्ण केली आहे. त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे यांनीही जर्मनीतील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांनी 120 किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर अपघात झाल्याने ही स्पर्धा अर्ध्यात सोडली. डॉ. स्मिता या इंडियन डेंटल असोसिएशनच्या हडपसर शाखेच्या सचिव आहेत.

डॉ. स्मिता यांनी या वर्षी दुबई येथे झालेल्या स्पर्धेत आयर्नमॅन किताब पटकावला आहे. हडपसरमधून सध्या या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांचा सहभाग होत असून, ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये डॉक्टर्स हिरहिरीने सहभागी होत आहेत, असे त्यांनी सांगितले.