पुणे

नॅशनल एरो मॉडेलिंग स्पर्धेत तिसरे बक्षिस एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना

हवेली प्रतिनिधी – अमन शेख

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग इंडिया (एसएई इंडिया) दक्षिण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय ऐरो मॉडलिंग स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत एमआयटी एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातर्फे सात विद्यार्थ्यांच्या एका संघाने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या तांत्रिक सादरीकरण विभागात तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सतिश काचे, फय्याज खान, प्रथमेश पाटील, शिवम बोराडे, ऋतिक सांळुखे, सात्वी संघानी, रिशु या सात विद्यार्थ्यांचा या संघात समावेश होता.
विद्यार्थ्यांना मिळवलेल्या यशाबदल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, ऐरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील डिंगरे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.