पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त “मोफत व अल्पदरात” सर्वरोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन महाराष्ट्र दर्पण टीव्ही न्यूज व एम्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर औंध,पुणे यांचा संयुक्त उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त,महाराष्ट्रातील पत्रकार,कलाकार,महाराष्ट्र पोलीस व त्यांचे कुटुंबीय
तसेच सर्व गरजू रुग्णांकरिता “अल्प दरात व मोफत” आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून
हे शिबिर आज पासून म्हणजेच दि.१३/१२/२०२१ ते १२/०१/२०२२ असे संपूर्ण महिनाभर असणार आहे,या शिबिराचा फायदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होणार आहे असे आयोजक अमित कुचेकर म्हणाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील,ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर देसाई,ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर बोदगिरे,सुप्रसिद्ध झुंबा इंस्ट्रक्टर रेखा कांगटानी,अभिनेत्री ऋतुजा इंगवले,एम्स रुग्णालयाचे हेड – सोशल सर्विसेस, डॉ.अशोक घोणे,युवा रक्षक संघटनेचे अध्यक्ष विनोद बेंगळे,ओपन लाइब्रेरी मूव्हमेंटच्या
प्रियंका चौधरी,सुप्रसिद्ध कवी अभिषेक अवचार, Epolindia चे संचालक गोपाल श्रीवास्तव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

महाराष्ट्र दर्पण न्यूज तसेच महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था या शिबिरात भाग घेणार असून,हे शिबिर पुण्यातील औंध येथील प्रसिद्ध एन.ए.बी.एच मानांकन प्राप्त रुग्णालय”एम्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटर” येथे घेण्यात आले आहे.

एम्स रुग्णालय हे हृदयाच्या तपासण्या,प्रोसिजर्स ऍन्जिओग्राफी,एन्जोप्लास्टी,व इतर सर्व शस्त्रक्रिया,तसेंच जनरल सर्जरी,मेंदूच्या शस्त्रक्रिया,प्लास्टिक सर्जरी, मनक्याचे,आर्थोपेडिक,सांधे बदलणे,बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, एंडोस्कोपी,नेफ्रोलॉजी,स्त्रीरोग, मूत्र विज्ञान,सर्व प्रकारच्या लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया,कॅन्सर वरील उपचार केमोथेरापी, इत्यादी करिता प्रसिद्ध आहे.येथे सर्व प्रकारच्या,गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने यशस्वीपणे केल्या जातात.

या शिबिरातऍन्जिओग्राफी फक्त ₹ ५,५००/-होणार असून रुग्णांना फक्त औषधाचा व रक्त तपासणी खर्च करावा लागणार आहे,बाकी सर्व खर्च मोफत होणार आहे.या शिबिरात सिनेकलाकार,पत्रकार पोलीस व त्यांचे कुटुंबीय तसेच अनेक सामाजिक संस्था भाग घेणार असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून गरजू रुग्ण येणार असून आज १०४ रुग्णांची नोंद झाली असून जवळपास ४३ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे व अनेक तपासण्या कमीत कमी खर्चात करण्यात येणार आहेत.तरी महाराष्ट्रातील सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,या शिबिरा बाबत अधिक माहिती साठी संपर्क साधावा संपर्क क्रमांक खालील प्रमाणे काथवटे व प्रगती(कॉर्डिनेटर) 9822087919/8149435113/8767443310 असे रुग्ण व सामाजिक कल्याण- प्रमुख डॉ.अशोक घोणे यावेळी म्हणाले.या शिबिरास रुग्णालयाच्या सिओ सुलक्षणा कातोरे, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ.भूषण सूर्यवंशी,सर्जेन डॉ.सचिन मांगडे,गोपाळ चव्हाण,अमित झोळ,ज्ञानेश्वर जाधव,अमर गाढवे,तुषार ढमढेरे,हर्ष फाउंडेशनचे आप्पा घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरास सह आयोजक संस्था पुढील प्रमाणे,जत एकात्मिक विकास फाउंडेशन,नागरिक अधिकार मंच,आम्ही पुणेकर,शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, शंकरा फाउंडेशन,
All India journalist association,Digital media journalist association, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,धनगर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य,अहिल्या शिक्षण संस्था पुणे महाराष्ट्र,Next Generation Cable network,Legal foresight law firm,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य,Epolindia,
युवा रक्षक सामाजिक संघटना इत्यादी.