हवेली

बेकायदेशीर सावकारी करण्या प्रकरणात बाबा बोडके टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केले अटक

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

व्यवसायिकाकडून प्रतिमहा पन्नास टक्के दराने व्याज घेऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बाबा बोडके टोळीतील एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. निलेश श्रीकांत जोशी (वय.40,रा.आनंदनगर वडगा बुद्रुक सिंहगडरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

           याप्रकरणी व्यवसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार जोशी याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात अवैध सावकारी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्यता माहितीनुसार,  जोशी हा बाबा बोडके टोळीतील सदस्य आहे. त्याच्यावर 2006 मधील एका खून प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. एका बांधकाम व्यवसायिकाने जोशी याच्याकडून सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जावर प्रतिमहा पन्नास टक्के व्याज देण्याचे कबूल करून दिलेली रक्कम व व्याज असे मिळून 50 लाख रुपये देण्याबाबत जोशी याने व्यवसायिकाकडून नोटराईज समजुतीचा करारनामा करून घेतला. त्यामध्ये व्यवसायिकाने 25 लाख रुपयांच्या मोबदल्यात 22 डिसेंबरपर्यंत 50 लाख रुपये देण्याचे कबूल करून घेतले.  तसेच जर व्यवसायिकाने निर्धारीत केलेल्या वेळेत ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर त्यांच्याकडील कोथरुड येथील 1200 स्क्वेअर फुटाच्या सदनिकेचा ताबा देईल असे लिहून घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे व्यवसायिक पैसे परत करू शकले नाहीत. त्यामुळे आरोपी जोशी हा तक्रारदार व्यवसायिकाच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करत कुटूंबातील सदस्यांचे बरेवाईट करण्याची धमकी देत होता.

            त्यामुळे घाबरून व्यवसायिकाने खंडणी विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याशी संपर्क साधून तक्रार अर्ज दाखल केला होता. अर्जाची चौकशी केली असता, जोशी याने व्यवसायिकाला व्याजाने दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात पन्नासटक्के प्रतिमहा व्याजाने पैसे घेतल्याचे व खंडणी मागितल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने जोशी याला अटक केली.

         ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे,उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विजय गुरव,प्रदिप शितोळे,सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, मोहन येलपल्ले यांच्या पथकाने केली.