पुणे

हडपसर ते तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय (लोणी काळभोर ) पीएमपीएल बस आज धावली अखेर शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख

लोणी काळभोर | हडपसर ते तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय (लोणी काळभोर ) येथे आज पासुन ठरलेल्या वेळापत्रकानुसार बससेवा सुरू करण्यास पुणे महानगर परिवाहन पीएमटी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी मान्यता दिली असुन शिवसेनेच्या लढ्याला अखेर यश मिळाले.श्रेय वादात पीएमपीएलची चालू होते की नाही अशी शंका नागरिकांना पडत असताना हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर व लोणी काळभोर येथील तमाम शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नातुन पीएमपीएलची आज हडपसर ते रामदरा अशी फेरी चालू झाली आहे.

राम नवमी साठी खूप भाविक तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे येत असतात येण्या जाण्या साठी काही वेळा वाहने मिळत न्हवती काही वेळा नागरिकांना चालत यावे जावे लागत होते आणि आज बस सेवा चालू झाली असता नागरिकांच्या चेऱ्यावर आनंद होता. नागरिक अतिशय समाधानी झाले. नागरिकांनी मनापासून आभार व्यक्त केले. याबाबत प्रशांत काळभोर यांनी सांगितले की दिनांक ०८-०४-२०२२ रोजी हडपसर ते रामदरा बस सेवा उद्घाटनाचा कार्यक्रम स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फक्त आणि फक्त श्रेयवाद घेण्यासाठी वरिष्ठ यंत्रणेचा वापर करून पीएमपीएलच्या अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव आणून हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले

परंतु शिवसेनेचे वरीष्ठ नेते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना. निलमताई गोऱ्हे, जिल्हा संपर्कप्रमुख मा. सचिन अहिर,शिवसेना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्याने आज पासून पीएमपीएलची बस सेवा चालू झाली आहे .या बस सेवेचा विदयार्थी , कामगार व नागरिकांनाफायदा होणार असुन बस रामदरा येथे येण्यासाठी नागरिक आतुरतेने वाट पाहत होते .उद्घाटन रद्द झाल्याबद्दल संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी दिलगिरी व्यक्त केली व उद्यापासून ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पीएमटी बस सेवा चालू होईल अशी ग्वाही दिली होती व त आज पूर्ण झाली.

 

FaceBook Link

https://fb.watch/cgZhn541AQ/