पुणे

साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कुशाबा घुले, उपाध्यक्ष पदी रोहिणी संदीप तुपे यांची निवड

हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कुशाबा घुले यांची तर उपाध्यक्ष पदी रोहिणी संदीप तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जिल्हा विशेष लेखापरीक्षक चं. बा. गव्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी बँकेचे सुकाणू समितीचे अध्यक्ष दिलीप आबा तुपे, आमदार चेतन तुपे व बँकेचे नवनिर्वाचित सर्व संचालक उपस्थित होते.
साधना सहकारी बँक गेली 44 वर्ष पुण्याच्या पूर्व भागात आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली बँक आहे, बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व महाराष्ट्रात 27 शाखा व 1 विस्तारित कक्ष असा बँकेचा विस्तार आहे.
बँकेकडे एकूण 548 कोटीच्या ठेवी असून 297 कोटीचे कर्ज वाटप केले आहे, बँकेस सतत ऑडिट वर्ग “अ” असून बँक वाढीत सभासदांचे योगदान म्हणून बँकेने बँकेच्या सभासदांसाठी मोफत शारीरिक आरोग्य तपासणी, कुटुंबनियोजन अनुदान, बँकेच्या सभासदांच्या पाल्याकरिता शैक्षणिक अनुदान, दुर्धर आजारासाठी सभासदांना आर्थिक अनुदान अशा अनेकविध योजना चालू केलेल्या आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळांनी कै. खा. विठ्ठल तुपे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.