पुणे

साहित्य सम्राटची साहित्यवारी मराठावाड्यात हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

साहित्य सम्राटची साहित्यवारी मराठावाड्यात

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

साहित्य सम्राट पुणे ही गेली अनेक वर्षें साहित्य चळवळ राबवित आहे. हि संस्था अनेक सामान्य रसिकांना संधी देऊन नामवंत साहित्यिक घडवीत आहे. संस्थेत मराठीसह हिंदी उर्दू ख्रिस्ती साहित्यिकांनाही सहभागी करून घेतले जाते. या संस्थेची कविसंमेलने फुटपाथ,मंदिरे,सोसायटी, कार्यालये आणि सभागृहात संपन्न होतात. हि संस्था साहित्यिक श्रावण सहल, शब्द गोड दिवाळी, वारीतिल कविसंमेलन, मोफत ग्रंथपेढी, अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे साहित्याची सेवा करत असते. ‘काव्य बोले काळजाला’ हा शाळा कॉलेज आणि उत्सवात विनोदातून प्रबोधन करणारा कार्यक्रम ही साहित्य सम्राट संस्था सातत्याने राबवताना दिसते.
या वर्षी संस्थेने मराठवाड्यात साहित्याची वारी हा तीन दिवसांचा उपक्रम पार पडला. हि साहित्य वारी उन्हाळ्याच्या दिवसात प्रथम थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्या ठिकाणी निर्माण केला तेथे गेले. त्या खांब मंदिराला सर्व कवींनी मनोभावे नमस्कार केला आणि साहित्य सम्राटचे १३२वे कविसंमेलन भक्ती विषयावर संपन्न झाले. हिच साहित्यवारी पुढे अहमदनगर येथील देवगड याक्षेत्री पोहोचली. तेथील निसर्गाने कवी मनांना भारावून टाकले आणि प्रवरा नदीतीरावर संस्थेचे १३३वे कविसंमेलन निसर्ग विषय घेऊन संपन्न झाले. त्या नंतर साहित्य सम्राटचे वारकरी जालना येथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी मंठा येथील २९व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले. या स्थळी साहित्य सम्राटचे १३४वे कविसंमेलन मा.किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कविसंमेलन झाले. यावेळी विचारमंचावर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक, साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ ,उपाध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, जेष्ठ कवी सीताराम नरके, सुप्रसिद्ध कवी आप्पा फुले, गायककवी आनंद गायकवाड आणि चित्रकारकवी दत्तात्रय पवार उपस्थित होते. आणि तिसऱ्या दिवशी हि वारी शिंदाळा तालुका नेवासा येथे पोहोचली.विचारांचा वारसा असलेल्या खेडेगावात येथे षट्कोळी साहित्यमंच आणि सोहम प्रकाशन यांनी आयोजित केले साहित्य सम्राटचे १३५वे कविसंमेलन तेही मा.किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक विषय घेऊन पार पडले. यावेळी संस्थेच्या या दिग्गज कवींनी सामाजिक कविता सादर केल्या. गावातील कवी बाळासाहेब अरगडे, संतोष साखरे,यांनीही भाग घेतला. कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक व प्रकाशक नितीन गायके, उत्कृष्ट सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार कॉ.बाबा अरगडे या यांनी व्यक्त केले.