मुंबई

खातेवाटपात भाजपने लिंबू मिर्ची फिरवली का हो स्वयंघोषित हिंदुत्ववावदी !! शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांचा शिंदे गटाला टोला !!

शिंदे आणि भाजप यांच्या सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर झाले , खातेवाटप पाहता सगळी महत्वाची खाती भाजपकडे आणि उरलेलं राहिलेलं शिंदे गटाकडे असे चित्र आहे , आपणच शिवसेना आणि आपणच हिंदुत्ववादी अशी ओरड करताना शिंदे गटातले भरत गोगावले यांनी शरद पवार यांनी शिवसेनेवर काळी जादू केली असे वक्तव्य केले होते त्याची आठवण करत मग आता भाजपने तुमच्या गटाला लिंबू मिर्ची बांधली का हो स्वयंघोषित हिंदुत्ववादी !! असा प्रश्न करत शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी शिंदे गटाची फिरकी घेतली आहे .
आपण म्हणू तेच भाजपचे वरिष्ठ नेते ऐकतात या भ्रमात असलेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आता भाजपचे पाणी ओळखू लागले असावेत . सगळी महत्वाची खाती भाजपकडे आणि उरलेले सुरलेले राहिलेले खाते यांच्या गटाकडे दिले गेले त्यामुळे शिंदे आणि गटाची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही , अवघड जागेच दुखणे अशीच यांची अवस्था झाली आहे असा टोलाही कान्हेरे यांनी लगावला .