कोविडच्या प्रतीक्षेनंतर शाळा, महाविद्यालये भरली राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुणे शहरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे (प्रतिनिधी)
आज कोविडच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा १८ महिन्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयात आगमन झाले. जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाने कधी नव्हते एवढा काळ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले, परंतु आता पुन्हा नव्या उमेदीने शाळा सुरू होताय तर मग या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी-शिक्षकांच्या स्वागताचा अनोखा उपक्रम राबवला.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करत मास्क सॅनिटायझर व चॉकलेट्सचे वाटप केले तसेच विध्यार्थ्यासह शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले.
यांत प्रामुख्याने खासदार वंदना चव्हाण यांनी ऑर्चीड स्कूल बाणेर येथे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वानवडी येथे, वडगांवशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी गेनबा मोझे स्कूल येरवडा येथे, आमदार चेतन तुपे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा येथे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिगंबर वाडी शाळा येथे, जेष्ठ नेते अंकुश काकडे यांनी शिवाजी मराठा हायस्कूल येथे, काका चव्हाण, संतोष चाकणकर यांनी बंडोजी चव्हाण विद्यालय धायरी येथे, अप्पा रेणुसे यांनी चिंतामणी विद्यालय येथे,शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष उदय महाले, निलेश निकम यांनी मॉर्डन हायस्कूल येथे, श्रीकांत पाटील यांक राजेंद्र प्रसाद विद्यालय बोपोडी येथे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी प्रतिभा पवार विद्यालय एरंडवणा येथे, नगरसेवक दिलीप बराटे यांनी मामासाहेब विद्यालय वारजे येथे,नगरसेविका अश्विनी कदम,नितिन कदम यांनी विद्या विकास शाळा येथे , नगरसेवक  बाबुराव चांदेरे यांनी कै. सोपानराव कटके विद्यालय बाणेर येथे, सदानंद शेट्टी यांनी बाबूराव सणस कन्या विद्यालय मंगळवार पेठ येथ, मच्छिंद्र उत्तेकर, सागर काकडे यांनी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे, दत्तात्रय धनकवडे यांनी ज्ञानेश स्कूल व व्यंकटेश स्कूल धनकवडी येथे, रविन्द्र माळवदकर व शिवानी माळवदकर यांनी धनराज गिरजी शाळा येथे, नगरसेविका सायली वांजळे यांनी कै. गुलाबराव वांजळे शाळा अहिरे याठिकाणी, माजी महापौर वैशाली बनकर यांनी महात्मा फुले शाळा व रामचंद्र बनकर शाळा हडपसर येथे, कासब्यात दीपक पोकळे व अजिंक्य पायगुडे यांनी रेणुका स्वरूप शाळा येथे,
तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या भागातील स्थानिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.