पुण्यात AMC हाफ मॅरेथॉनचा दिमाखदार शुभारंभ! ‘RUN. BURN THAT FAT’ | 10 हजारांचा सहभाग अपेक्षित

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यात AMC हाफ मॅरेथॉनच्या सातव्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!
‘RUN. BURN THAT FAT’चा संदेश देत ८ ते १० हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित
पुण्यातील हाफ मॅरेथॉनच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी…
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी खराडी येथील हॉटेल फेअरफिल्ड मॅरिअटमध्ये असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट अर्थात AMC पुणे आयोजित हाफ मॅरेथॉनच्या सातव्या पर्वाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला.
पुणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची नामांकित वैद्यकीय संघटना असलेल्या AMC पुणेकडून गेल्या सहा वर्षांपासून वैद्यकीय जनजागृतीच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे.
यंदा मॅरेथॉनचे सातवे वर्ष असून ‘RUN. BURN THAT FAT’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याचा यामागचा उद्देश आहे.
१३ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक नोबल हॉस्पिटल, तर मगरपट्टा सिटी हे व्हेन्यू पार्टनर आहेत.
AIMS Certified असलेली ही पुण्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठी मॅरेथॉन असून, गेल्या वर्षी तब्बल पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. यंदा तब्बल ८ ते १० हजार नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Silver Lining IVF Centre, MOC Cancer Centre आणि Seasons Mall हे सहप्रायोजक आहेत. तर विश्वराज हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, म्हस्के हॉस्पिटल, मिडास हिलिंग सेंटर आणि जागृती रिहॅबिलीटेशन सेंटर हे सहयोगी प्रायोजक आहेत. पोकारी स्वेट हे हायड्रेशन पार्टनर आहेत.
उद्घाटन सोहळ्याला डॉ. दिलीप माने, डॉ. एस. के. राऊत, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. मृण्मयी धर्माधिकारी, डॉ. तुषार पाटील, डॉ. चेतन म्हस्के, डॉ. अमर शिंदे, श्री शंभू, निलेश काळे आणि श्री तारू आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दिलीप माने आणि इतर मान्यवरांनी मॅरेथॉनचे डिजिटल उद्घाटन करून यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
या मॅरेथॉनसाठी सतिश दादा मगर, माजी उपमहापौर निलेश मगर, शिरीष मगर, विवेक मगर, श्रीमती जेकब, मनोज शर्मा आणि अजय मल्होत्रा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि माजी अध्यक्ष डॉ. दिलीप माने यांनी फिटनेसचे महत्त्व विषद केले. विद्यमान AMC अध्यक्ष डॉ. साधना धर्माधिकारी यांनी मॅरेथॉनचा रंजक इतिहास सांगितला, तर रेस डायरेक्टर डॉ. ओंकार हरिदास यांनी यंदाच्या ‘RUN. BURN THAT FAT’ या संकल्पनेविषयी माहिती दिली.
संघटनेचे सचिव डॉ. हिमांशु पेंडसे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तर कोषाध्यक्ष डॉ. सुशांत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. रोशनी कावळे, सहसचिव डॉ. हृषिकेश मेहता, रेस सेक्रेटरी डॉ. अक्षय राऊत, तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतिक राऊत, डॉ. रश्मी भावसार, डॉ. आनंद भन्साळी, डॉ. मनोज झाल्टे, डॉ. माधव धर्मे आणि डॉ. अजितेय ताम्हाणे उपस्थित होते.
त्याचबरोबर डॉ. अविनाश बावकर, डॉ. योगेश सातव, रश्मी सातव, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. शोभनाथ यादव, डॉ. मोहिनी भोसले, डॉ. ओम हलिंगे, डॉ. जागृती दाहिलकर, सागर माहेश्वरी, अविनाश तिवारी, फिनोव्हेट टीम आणि अजय देसाई ब्लू ब्रिगेड टीम यांचीही विशेष उपस्थिती होती.
एकूणच, फिटनेस, आरोग्य आणि लठ्ठपणाविरोधातील जनजागृतीचा संदेश देणारी AMC पुणे हाफ मॅरेथॉन आता १३ डिसेंबरला रंगणार असून, यंदा ८ ते १० हजार नागरिकांच्या सहभागामुळे ही मॅरेथॉन आणखी भव्य होण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.