नऱ्हेत मोठी कारवाई! ४ गावठी पिस्तुले, ३ काडतुसे जप्त; २३ वर्षीय आरोपी अटकेत

Rokhthok Maharashtra 3 0

पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नऱ्हे परिसरातून विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ने गोकुळनगर, नऱ्हे येथे सापळा रचला.
कारवाईदरम्यान भूषण उत्तम मोहिते (वय २३) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून ४ गावठी पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे आणि सुमारे ₹२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने ही पिस्तुले विक्रीसाठी आणल्याची आणि ती दुसऱ्या व्यक्तीकडून मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ही शस्त्रे कुठून आणली, कोणाला विकली जाणार होती आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पुणे गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.