तपासाच्या नावाखाली कास पठारावर पर्यटन! तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

Rokhthok Maharashtra 5 0

पुणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांवर गंभीर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली कास पठारावर पर्यटन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलीस शिपाई कोमल कांबळे यांना अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.
४ एप्रिल २०२६ रोजी एका गुन्ह्याच्या तपासासाठी हे अधिकारी फिर्यादी महिलेसह सातारा जिल्ह्यात गेले होते. तपास पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुण्यात परतणे अपेक्षित असताना त्यांनी कास पठारासह इतर पर्यटनस्थळांना भेट दिल्याचे चौकशीत उघड झाले.
दरम्यान, फिर्यादी महिलेने तिची आई आजारी असून घरी एकटी असल्याने लवकर पुण्यात परतण्याची विनंती केली होती. मात्र, त्या विनंतीकडे दुर्लक्ष करून पर्यटन केल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात तिन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, या निर्णयाची पोलिस वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.